धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला… नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
पालघरनंतर आता नागपूरमध्ये समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा किशोर वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणाची माहिती दिली.
पालघरनंतर आता नागपूरमध्ये समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा किशोर वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, इन्स्टाग्रामवरून ओळख वाढवून एका तरुणीला जाळ्यात ओढण्यात आले. सुरुवातीला प्लॉट खरेदीच्या बहाण्याने संपर्क साधण्यात आला. त्यानंतर संबंधित तरुणीला नशा देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.
इतकेच नाही तर तिचे अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करण्यात आले. पुढे तिला मध्यप्रदेशात नेऊन धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर पालक आणि महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार चित्रा किशोर वाघ यांनी मुली, महिला आणि पालकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावरील ओळखीवर सहज विश्वास ठेवू नका, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे.
