Nagpur | शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू करतोय पेट्रोल पंपावर काम
प्रवीण वाहले या खेळाडूला आट्या-पाट्या या खेळात 2006 साली शिवछत्रपती पुरस्कार मिळाला होता. सोबतच आठ गोल्ड मेडलसुद्धा यांनी पटकावलेले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हाताने वाहले यांना छत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.
नागपूर : प्रवीण वाहले या खेळाडूला आट्या-पाट्या या खेळात 2006 साली शिवछत्रपती पुरस्कार मिळाला होता. सोबतच आठ गोल्ड मेडलसुद्धा यांनी पटकावलेले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हाताने वाहले यांना छत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. स्पोर्ट कोट्यातून त्यांना नोकरी मिळणं अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही. आज त्यांना आपल्या परिवारांचं पालन-पोषण करण्यासाठी एका पेट्रोल पंपावर गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्याचं काम करावं लागत आहे. या ठिकाणी वाहले यांना तुटपुंज्या पगारात काम करावं लागत आहे. महिनाभर काम करुन त्यांना 8 हजार रुपये पगार मिळतो.
Published on: Aug 21, 2021 6:50 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
