लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत… बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच उबाठाची अवस्था दिवा विझताना जसा मोठा प्रकाश होतो तशी झाली असल्याचे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

ऑपरेशन टायगर 3 संदर्भात बोलताना, नरेश म्हसके म्हणाणे, शिंदे साहेबांना रोज आमदार भेटत असून लवकरच मोठी चलबिचल दिसेल असा दावा केला आहे. इतकेच नाही तर त्यांनी, ‘रोजच आमदार शिंदेंना भेटतात आणि कैफियत मांडतात’ असं खळबळजनक विधान केलं. काँग्रेसची दलाली सुरू असल्याचा आरोप करत नरेश म्हस्के यांनी शरद पवार यांनी स्वतःचा पक्ष विलीन करावा असा टोला लगावला.
दरम्यान, उद्धव ठाकरे हे बंडखोरी करणाऱ्या खासदारांच्या मतदारसंघात दौरा करणार असल्याच्या चर्चेवर बोलताना, गरज असताना ते घरात बसले होते, आता दौऱ्याची गरज का लागली असा सवाल त्यांनी केला.