Nashik | पायी वारीला परवानगी द्यावी, वारकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी
सरकारला आमची विनंती आहे, की तुम्ही नियम द्यावेत. मर्यादित वाऱकऱ्यांच्या उपस्थितीत निवृत्तीनाथांची पालखी पायी जावी अशी आमची इच्छा आहे. अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे.
नाशिक : महाराष्ट्रात वारीची संस्कृती आहे. जगात कोरोनाचे महासंकट असताना मागच्या वर्षी वारी झाली नाही. मात्र, यावर्षी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली आहे. सरकारने निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्व संतांच्या पायी वाऱ्या व्हाव्यात अशी सर्व वारकऱ्यांची इच्छा आहे. आम्ही सराकारला सर्व पर्याय दिले आहेत. सरकार जी बंधने घालतील, जे नियम लावेल त्या नियमांत आम्ही वारी तयार आहोत. पण आम्ही वारी बंद करायला तयार नाही. म्हणून सरकारला आमची विनंती आहे, की तुम्ही नियम द्यावेत. मर्यादित वाऱकऱ्यांच्या उपस्थितीत निवृत्तीनाथांची पालखी पायी जावी अशी आमची इच्छा आहे. अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
