Navi Mumbai | शरद पवार गटाच्या आंदोलनादरम्यान मोठी घडामोड; रोहिणी खडसेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्….

Navi Mumbai | शरद पवार गटाच्या आंदोलनादरम्यान मोठी घडामोड; रोहिणी खडसेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्….

| Updated on: Jun 03, 2026 | 4:10 PM

देशात वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आज नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून, पोलिस आणि आंदोलक आमनेसामने आल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी चूल मांडून तसेच भांडी वाजवून सरकारच्या धोरणांविरोधात निषेध नोंदवला.

देशात वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आज नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून, पोलिस आणि आंदोलक आमनेसामने आल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी चूल मांडून तसेच भांडी वाजवून सरकारच्या धोरणांविरोधात निषेध नोंदवला. आंदोलनकर्त्यांचा मोर्चा अडवण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक तसेच ढकलाढकली झाल्याचे पाहायला मिळाले.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. यामध्ये सुप्रिया सुळे, रोहिणी खडसे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि सक्षणा सलगर यांचा समावेश होता. रोहिणी खडसे यांना पोलिसांनी उचलून नेत ताब्यात घेतल्याचेही पाहायला मिळाले. आंदोलनानंतर प्रतिक्रिया देताना जयंत पाटिल यांनी राज्य सरकारवर टीका केली. “महाराष्ट्रात आंदोलन करण्याचाही अधिकार उरलेला नाही. आंदोलन करणाऱ्या नेत्यांना ताब्यात घेणे चुकीचे असून आम्ही त्याचा निषेध करतो,” असे ते म्हणाले.

तर सुप्रिया सुळे यांनी वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारामुळे देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक बनल्याचा आरोप केला. याच मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या आंदोलनामुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Published on: Jun 03, 2026 4:03 PM
Follow Us