राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं? प्रमुख नेत्यांनी…
राजकीय वर्तुळात वारंवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा रंगतच असतात. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाच्या आधी विलिनीकरणाबाबत महत्त्वाची बैठक झाल्याचं अनेक नेत्यांनी सांगितलं होतं. मात्र या बातम्या केवळ चर्चाच बनून राहिल्या होत्या.

अलीकडे एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुन्हा विलिनीकरणाच्या मुद्द्यावरूनच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली. ही चर्चा पुण्यात पार पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसारच या चर्चेसाठी जयंत पाटील, अमोल कोल्हे यांच्यासह अनेक प्रमुख नेते सहभागी झाले होते. इतकेच नाही तर या गुप्त बैठकीत विलिनीकरणासोबतच तटकरेंनी तब्बल तीन वर्षांनंतर शरद पवारांची भेट घेतली यावरही चर्चा करण्यात आली.
अद्याप राष्ट्रवादीतील कोणत्याही नेत्याने याबाबत स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी या भेटीबाबत लवकरच माहिती समोर येण्याची शक्यता आहे.