भरसभेत पवारांनी लावला मोदींचा ‘तो’ व्हिडीओ, तर शिंदे अन् फडणवीसांकडून जोरदार पलटवार

| Updated on: Apr 26, 2024 | 11:07 AM

प्रचाराला धार येण्यासाठी शरद पवारांनी मोदींचे जुने व्हिडीओ काढले. शरद पवार यांनी २०१४ चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ भर सभेत दाखवला त्यानंतर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या जुन्या सभेची क्लिप दाखवली. शिंदे अन् फडणवीसांनी काय केला जोरदार पलटवार?

Follow us on

लोकसभेच्या प्रचारसभेत जुन्या व्हिडीओवरून वार-पलटवार सुरू आहेत. प्रचाराला धार येण्यासाठी शरद पवारांनी मोदींचे जुने व्हिडीओ काढले. शरद पवार यांनी २०१४ चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ भर सभेत दाखवला त्यानंतर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या जुन्या सभेची क्लिप दाखवली. एकेकाळी मोदींच्या नावाने मत मागणाऱ्यांनी आता सरड्यासारखा रंग बदलला अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. महाराष्ट्रात प्रचारासाठी येऊनही मोदी महागाईवर बोलत नाहीत, अशी टीका पवारांनी केली. यावेळी त्यांनी प्रचारातच मोदींचा व्हिडीओ लावला. मतदानाला जाताना सिलेंडरला नमस्कार करून जा, असं या व्हिडीओमध्ये म्हटलंय. त्यावेळी मनमोहन सिंग सरकारवर भाजपचे नेते जोरदार टीका करत होते. तोच महागाईचा मुद्दा पवारांनी हाती घेतलाय. तर पवारांच्या कोलांटउड्या दाखवण्यासाठी आम्ही किती व्हिडीओ दाखवायचे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हणत पलटवार केला. बघा स्पेशल रिपोर्ट….