Vidhan Parishad Election | राष्ट्रवादीतून विधान परिषदेत नेमकं कोण जाणार? राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर तटकरे लाईव्ह

Vidhan Parishad Election | राष्ट्रवादीतून विधान परिषदेत नेमकं कोण जाणार? राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर तटकरे लाईव्ह

| Updated on: Apr 29, 2026 | 11:22 AM

विधान परिषदेवर कोणत्या पक्षातून कोणाला संधी मिळणार? याची मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान, काहीसा कालावधी शिल्लक असतानाच सर्व पक्षांनी मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत.

सरासरीनुसार राष्ट्रवादी पक्षाकडे विधानपरिषदेची एक जागा आहे. या जागेवर नेमकं कोणाला निवडणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं.

या जागेसाठीच राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीने बैठक बोलावली होती. ती पार पडल्यानंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तटकरे म्हणाले, ‘कोअर कमिटीचा निर्णय जवळपास झालाच आहे, संध्याकाळपर्यंत आम्ही उमेदवाराचे नाव जाहीर करू. आम्ही सारासार विचार करून, गुणवत्ता तसेच प्रादेशिक तत्त्वांचा विचार करून नाव जाहीर करू. ‘

नाराजी बद्दल विचारताच तटकरे म्हणाले, ते सहाजिक आहे… अनेकांमध्ये एकाला निवडताना नाराजी होतेच, ती सगळ्या पक्षांमध्ये होतच राहते.’

Published on: Apr 29, 2026 11:22 AM
Follow Us