मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा… अखेर मोटेगावकरला अटक; नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई
देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात केमिस्ट्रीचे प्राध्यापक आणि लातूरमधील RCC Classes चे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना CBI ने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे NEET पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पुन्हा एकदा लातूरपर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून CBI चे पथक लातूरमध्ये तळ ठोकून असून, आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. प्रा. मोटेगावकर यांची पुण्यातील CBI कार्यालयात रात्रभर चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज परत सकाळीही त्यांची चौकशी सुरू ठेवण्यात आली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, लातूरमधील RCC Classes परिसरातही CBI कडून इतर संबंधितांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात नांदेड, नाशिक आणि पुणे येथूनही CBI च्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, गेस पेपरमधील तब्बल 42 प्रश्न NEET परीक्षेत तंतोतंत आल्याच्या तक्रारीनंतर खासगी कोचिंग क्लासेसच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. तसेच, काही खासगी क्लासेस संचालक आणि आरोपी पी. व्ही. कुलकर्णी यांच्यात संबंध असल्याचाही तपास CBI कडून केला जात आहे.
दरम्यान, प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या लातूर येथील घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, NEET गैरव्यवहार प्रकरणात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.