NEET Paper Leak | कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क… कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाहानं मनीषा हवालदारबाबत सगळंच सांगून टाकलं
नीट पेपरफुटी प्रकरणात तिसऱ्या मनीषाला अटक झाली होती. मात्र तिने कोणताही पुरावा न सोडता पेपर फोडला कसा? याबाबत चौकशी सुरु होती, आता या प्रकरणाला नवं वळण आलं आहे. अलीकडेच तपास यंत्रणांकडून मोठी कारवाई करत आणखी दोन आरोपींना अटक केली. त्यामुळे आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या 13 वर पोहोचली आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणात तिसऱ्या मनीषाला अटक झाली होती. मात्र तिने कोणताही पुरावा न सोडता पेपर फोडला कसा? याबाबत चौकशी सुरु होती, आता या प्रकरणाला नवं वळण आलं आहे. अलीकडेच तपास यंत्रणांकडून मोठी कारवाई करत आणखी दोन आरोपींना अटक केली. त्यामुळे आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या 13 वर पोहोचली आहे. एका क्लास संचालकाच्या अल्पवयीन मुलाने CBI समोर महत्त्वाची माहिती दिल्यानंतर तपासाला वेग आला आहे. अटक केलेल्याचे नाव तेजस शाह सांगितले जात आहे.
या प्रकरणातील आरोपी तेजस हर्षदकुमार शाह हे पुण्यातील ‘डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी’मध्ये फिजिक्स विषय शिकवत असल्याची माहिती समोर आली. यावेळी त्याची कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. पेपरफुटी प्रकरणात मनीषा हवालदारच नाही, तर तिचा पतीदेखील सामिल होता. तेजस शाहने सांगितल्यानुसार, मनीषा हवालदारने कोणाला सुगावा लागू नये म्हणून प्राध्यापक तेजसला काही प्रश्न तोंडी सांगितले. मनीषाने सांगितलेले प्रश्न पेपरमध्ये आले होते, असंही तपासात समोर येत आहे. मनीषा हवालदारने तेजससारख्या आणखी किती खासगी प्रध्यापकांना प्रश्न दिले, याबबात पोलीस यंत्रणा कसून तपास करत आहे. त्यामुळे दररोज नवी माहिती समोर येत आहे.
