Pune | मोटेगावकरविरोधात आता बुलडोझर कारवाई, पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट…

Pune | मोटेगावकरविरोधात आता बुलडोझर कारवाई, पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट…

| Updated on: May 20, 2026 | 4:58 PM

देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता पुण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या शिवराज मोटेगावकर यांच्या RCC क्लासेसवर पुणे महानगरपालिकेने कारवाई करत क्लासेस सील केले आहेत. सीबीआयकडून सुरू असलेल्या तपासात अनेक धागेदोरे समोर येत असताना ही महत्त्वाची घडामोड घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जागेचा विनापरवानगी वापर करण्यात येत असल्याचे आढळल्यानंतर पालिका प्रशासनाने ही कारवाई केली. तसेच क्लासेस परिसरातील अतिक्रमण असलेल्या भागावर बुलडोझर चालवत अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले.
दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली असून लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू असून, विविध ठिकाणी चौकशी आणि कारवाया सुरू आहेत. पुण्यातील या कारवाईमुळे प्रकरणाला आणखी वेग आला असून पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: May 20, 2026 4:58 PM
Follow Us