एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेतील तो व्हिडीओ व्हायरल, पाहा…

एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेतील तो व्हिडीओ व्हायरल, पाहा…

| Updated on: May 18, 2026 | 5:13 PM

देशभरात गाजत असलेल्या नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रातील लातूरपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने मोठी कारवाई करत लातूरमधील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना अटक केली आहे.

सीबीआयने रविवारी, 17 मे 2026 रोजी सायंकाळी पुण्यातून त्यांना ताब्यात घेतले. नीट परीक्षेतील गैरप्रकारांबाबत तपास सुरू असताना नाशिकनंतर लातूरचे नाव समोर आल्याने राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे शिवराज मोटेगावकरांचा हा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये ते एका कॉंग्रेस नेत्याच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी अमित देशमुख यांचा जोरदार प्रचार केला. यावेळी त्यांनी सांगितलं, “आम्ही अमित देशमुख नावाचं कुंकू लावलं आहे. हे कुंकू तात्पुरतं नसून सात जन्मांसाठी आहे.’

यावर भाजप नेते नवनाथ बन यांनी सांगितलं आहे की, काँग्रेसचा या प्रकरणाशी संबंध असू शकतो. त्यांना जाब विचारायला पाहिजे.

Published on: May 18, 2026 05:13 PM
Follow Us