Video | मोटेगावकराने फोडलेल्या पेपरचा उघडपणे घेतला सराव, त्यानंतर व्हिडिओही केला शेअर, हादरवून टाकणारी माहिती समोर…
नीट (NEET) पेपरफुटीमुळे देशभरातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे प्रचंड मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान झाले आहे. परीक्षेतील अनियमिततेमुळे परीक्षा रद्द होण्याची नामुष्की ओढवली, ज्यामुळे २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणात एक-दोन नव्हे तर आरोपींचे सापळेच समोर आले आहेत. या प्रकरणात प्रामुख्याने घेतली जाणारी नावे म्हणजे, मनीषा मंधारे, कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर.
नीट (NEET) पेपरफुटीमुळे देशभरातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे प्रचंड मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान झाले आहे. परीक्षेतील अनियमिततेमुळे परीक्षा रद्द होण्याची नामुष्की ओढवली, ज्यामुळे २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणात एक-दोन नव्हे तर आरोपींचे सापळेच समोर आले आहेत. या प्रकरणात प्रामुख्याने घेतली जाणारी नावे म्हणजे, मनीषा मंधारे, कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर. या तिघांनी मिळून बेत आखला आणि यात अनेकांना सामील केले.
दरम्यान, मोटेगावकर यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नीट पेपरच्या बरोबर एक दिवसा आधीचा असल्याचं सांगितलं जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या व्हिडिओमध्ये आरसीसी क्लासेसमधील मुलांची मॉक टेस्ट घेतली जात आहे. यामध्ये मुलांकडून फोडलेल्या प्रश्नांचा सराव करून घेतला जात असल्याचा दावा आहे. समोर आलेल्या या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे. या बाबीचा सखोल तपास सुरू असून मोटगावकर यांच्या क्लासेस, सोशल मीडिया अकाउंट, अशा अनेक गोष्टींची पडताळणी सुरू आहे.
