लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच त्याने… मोटेगावकरने असा फोडला पेपर; वाचा ईनसाईड स्टोरी!
देशभरात गाजत असलेल्या नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील लातूरपर्यंत पोहोचले. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने मोठी कारवाई करत लातूरमधील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना अटक केली आहे. सीबीआयने रविवारी, 17 मे 2026 रोजी सायंकाळी पुण्यातून त्यांना ताब्यात घेतले.

नीट परीक्षेतील गैरप्रकारांबाबत तपास सुरू असताना नाशिकनंतर लातूरचे नाव समोर आल्याने राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
तासंतासाच्या चौकशीनंतर मोटेगावकर यांच्या पेपरफुटीसंबंधातील गूढ समोर येत आहेत. मोटेगावकराकडे परीक्षेच्या दहा दिवसांआधीच प्रश्नपत्रिका मिळवली होती. त्याने ती अनेक विद्यार्थ्यांना दिल्याची माहितीदेखील सूत्रांकडून मिळाली आहे, मात्र त्याने विद्यार्थ्यांची नावे सांगितली नाहीत. या प्रकरणासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे, ती म्हणजे मोटेगावकरने आपल्या मुलासाठी पेपर फोडल्याचं सूत्रांनी कळवलं आहे. या भयंकर प्रकार केल्यानंतर त्याला काय वाटतं असं विचारता त्याने काहीच उत्तर दिलं नाही, असंही सूत्रांनी सांगितलं आहे.
एकूणच मोटेगावकराने मुलासाठी कुलकर्णी यांच्याकडून पेपर घेतला. याचा पुरावा सीबीआयला तांत्रिक तपासातून सापडला. मोटेगावकराच्या फोनमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटो होते.