Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच… अभिजीत दीपकेंचा मोठा दावा

Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच… अभिजीत दीपकेंचा मोठा दावा

| Updated on: Jul 21, 2026 | 4:45 PM

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलनाचे प्रमुख अभिजित दीपके यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आंदोलनाची सद्यस्थिती जाणून घेतली.

अभिजित दीपके यांनी शरद पवार यांना आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या प्रमुख मागण्यांची माहिती दिली. यानंतर माध्यमांशी बोलताना दीपके यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीही विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची विचारपूस केली असून, आंदोलनाबाबत सातत्याने संपर्क ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.

दीपके यांनी पुढे सांगितले की, सुरक्षा व्यवस्थेमुळे शरद पवार यांना आंदोलनस्थळाच्या आत नेणे शक्य झाले नाही. मात्र, त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची आणि आंदोलनाच्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. देशभरातील विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर आंदोलनाला भेट देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, काल CJP कडून संसद भवनाच्या दिशेने काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष झाला होता. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली. या घटनेत पोलिस कर्मचारी आणि आंदोलनकर्ते दोन्ही बाजूंनी जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, या कारवाईवरून देशभरात चर्चा सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या जंतर-मंतर भेटीला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही गरज पडल्यास आपण स्वतः आंदोलनस्थळी येऊन बसू, असे जाहीर करत आंदोलनाला पाठिंबा कायम असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.  

Published on: Jul 21, 2026 4:45 PM
Follow Us