मारो… मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?

मारो… मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?

| Updated on: Jul 21, 2026 | 4:19 PM

दिल्लीतील CJP आंदोलन अद्यापही सुरू असून, या आंदोलनाने देशभरात मोठी चर्चा निर्माण केली आहे. शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा, NEET पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील युवक राजधानी दिल्लीत एकत्र आले आहेत. आंदोलनादरम्यानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यातील एका तरुणाची विशेष चर्चा रंगली आहे.

20 जुलै रोजी दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिस कारवाई सुरू असताना “मारो, मारो” असे म्हणत पोलिसांसमोर ठामपणे उभा राहिलेल्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या तरुणाची ओळख आता नागपूरमधील भारत बनाईत अशी झाली असून, तो CJP आंदोलनात सहभागी होण्यासाठी नागपूरहून दिल्लीत गेला होता.

भारत बनाईत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आंदोलनादरम्यान पोलिसांनी अचानक लाठीचार्ज सुरू केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना घेरल्याचा आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, आपण आंदोलनातून माघार घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी पोलिसांसमोर ठाम भूमिका घेतली, असे त्यांनी सांगितले.

भारत बनाईत यांनी पुढे सांगितले की, आंदोलनादरम्यान एका मराठी तरुणाने त्यांचा व्हिडिओ चित्रित केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि देशभरातून त्यांना हजारो फोन व संदेश येऊ लागले. नागपूरसह विविध भागांतून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आपण पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट करत भारत बनाईत यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठीचा लढा सुरूच राहील, असा निर्धार व्यक्त केला. तसेच नागपूरमधील CJP आंदोलनाच्या आयोजनातही आपण सहभागी असल्याची माहिती त्यांनी दिली. दिल्लीतील आंदोलन आणि त्यातून समोर आलेल्या या व्हिडिओमुळे देशभरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची चर्चा अधिक तीव्र झाली आहे.  

Published on: Jul 21, 2026 4:19 PM
Follow Us