नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, निदा खानचं नेमकं काय होणार?

नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, निदा खानचं नेमकं काय होणार?

| Updated on: May 11, 2026 | 4:51 PM

नाशिकच्या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणातील वॉन्टेड आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे, आज या प्रकरणातील दोन मोठ्या सुनावण्या पार पडणार आहेत. आज निदा खान हिची कोठडी संपणार असून तिला कोर्टात हजर केले जाणार आहे. ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचंही समोर आलं होतं.

नाशिकच्या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणातील वॉन्टेड आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला सहआरोपी करण्यात आले आहे. मतीन पटेल याने निदाला फरार असताना ४२ दिवस आसरा दिला होता. महत्त्वाची बाब म्हणजे, आज या प्रकरणातील दोन मोठ्या सुनावण्या पार पडणार आहेत. आज निदा खान हिची कोठडी संपणार असून तिला कोर्टात हजर केले जाणार आहे. ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचंही समोर आलं होतं.

त्याशिवाय याच प्रकरणातील इतर आरोपींच्या जामीन अर्जावरही आज सुनावणी होणार आहे. तर आता कोर्टात नेमकं काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अनेक राजकीय नेतेदेखील या प्रकरणावर विधाने करत आहेत.

Published on: May 11, 2026 4:32 PM
Follow Us