Nida Khan | 171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन… TCS धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक खुलासे

| Updated on: May 11, 2026 | 10:45 AM

नाशिकच्या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणातील वॉन्टेड आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. मतीन पटेल याने निदाला फरार असताना 42 दिवस आसरा दिला होता. महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रकरणी पोलिसांना आणखी एक धक्कादायक अपडेट मिळाली आहे.

नाशिकच्या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणातील वॉन्टेड आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला सहआरोपी करण्यात आले आहे. मतीन पटेल याने निदाला फरार असताना 42 दिवस आसरा दिला होता. महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रकरणी पोलिसांना आणखी एक धक्कादायक अपडेट मिळाली आहे.

आरोपी निदा खानने पीडित मुलीच्या घरी जाऊन धार्मिक विधी केल्याचं समोर आलं आहे.पीडितेचं मत परिवर्तन करण्यासाठी तिनं हे केलं. इतकेच नाही, तर पोलीस तपासात 171 लिंक्सचा उलगडा झाला आहे. या लिंक निदाने पीडितेला पाठवलेल्या आहेत, ज्यामध्ये धार्मिक माहिती आणि गोष्टी आहेत. निदाला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. कालदेखील तिची आयुक्तालय कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली होती. नाशिकमधील या गंभीर प्रकरणाची महिला सूत्रधार सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, त्यामुळे या घटनेबाबत आणखी अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.

Published on: May 11, 2026 10:45 AM
Follow Us