निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती? धक्कादायक माहिती समोर
नाशिकच्या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणातील वॉन्टेड आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे.
नाशिकच्या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणातील वॉन्टेड आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला सहआरोपी करण्यात आले आहे. मतीन पटेल याने निदाला फरार असताना 42 दिवस आसरा दिला होता. महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रकरणी पोलिसांना आणखी एक धक्कादायक अपडेट मिळाली आहे.
आरोपी निदा खान ही फरार असताना एकाच ठिकाणी राहणार नव्हती. स्वतःचा बचाव करण्यासाठी तिने अनेक ठिकाणं बदलत अखेर तेलंगणाला जाण्याचं ठरवलं होतं. तिला छत्रपती संभाजी नगरातून अटक करण्यात आली. मात्र तिला मतीन पटेलच्या आधही अनेक जणांनी आसरा दिला असावा अशी शंका आहे. निदाला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. कालदेखील तिची आयुक्तालय कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली होती. नाशिकमधील या गंभीर प्रकरणाची महिला सूत्रधार सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, त्यामुळे या घटनेबाबत आणखी अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.
