Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा

Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा

| Updated on: Oct 03, 2026 | 1:03 PM

मुंबईतील दादर येथे विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी सीजेपीचे अभिजीत दिपके यांच्यासह ५०० आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. भाजप नेते नितेश राणे यांनी या आंदोलनावर तुकडे-तुकडे गँग आणि देशविरोधी शक्तींच्या उपस्थितीचा आरोप केला. आंदोलनात पैशांवरून वाद झाल्याचा दावाही समोर आला आहे.

मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी सीजेपी (CJP) या संघटनेचे नेते अभिजीत दिपके यांच्यासह सुमारे ५०० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिपके यांच्यासह आशुतोष रांका, सौरभ दास आणि साम्या कोरंडे यांच्यावरही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

या घटनेनंतर, भाजप नेते नितेश राणे यांनी सीजेपीच्या आंदोलनावर जोरदार टीका केली आहे. राणे यांनी आरोप केला की, “सीजेपीच्या मंचावर तुकडे-तुकडे गँगचे सदस्य उपस्थित होते.” तसेच, त्यांनी या आंदोलनात देशविरोधी शक्तींना हवा दिली जात असल्याचा आणि उमर खालिदसारख्या व्यक्तींना अप्रत्यक्षपणे समर्थन दिले जात असल्याचा दावा केला. राणे यांनी अभिजीत दिपके यांच्यावर पंजाब किंवा दिल्लीत जाऊन बोलण्याची हिंमत नसल्याचा आरोपही केला.

दरम्यान, नवनाथ बन यांनीही या आंदोलनावर टीका करताना, आंदोलनात पैशांवरून वाद झाल्याने आंदोलकांमध्ये हाणामारी झाल्याचा आरोप केला आहे.

Published on: Oct 03, 2026 1:03 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us