Nitesh Rane | मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये; आता विभागीय बैठका ऑनलाइन, नितेश राणेंचा मोठा निर्णय
जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर राज्य सरकारही अॅक्शन मोडमध्ये आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला इंधन बचतीसंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असून, त्यानुसार मंत्री नितेश राणे यांनी मत्स्यविकास आणि बंदर विभागासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

नितेश राणे यांनी विभागातील सर्व बैठका ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. ऊर्जा बचत आणि परकीय चलनाची बचत या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मत्स्यविकास आणि बंदर विभागात ऑनलाइन बैठकीच्या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. यामुळे इंधन बचतीसोबतच वेळेची बचत आणि प्रशासनिक कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून विविध विभागांमध्ये अशाच प्रकारच्या उपाययोजना राबवल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.