Nitin Gadkari | गडकरी बसमध्ये… पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की दिखावा?

Nitin Gadkari | गडकरी बसमध्ये… पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की दिखावा?

| Updated on: May 14, 2026 | 4:43 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर देशभरात विविध स्तरांवर त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देत बसमधून प्रवास केला. मात्र, त्यांच्या या प्रवासादरम्यान बसच्या मागे 30 ते 40 वाहनांचा मोठा ताफा दिसून आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

खर्च कमी करणे आणि इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी गडकरी यांनी बसने प्रवास केल्याचे सांगितले जात असताना, त्यांच्या मागे कार्यकर्ते, अधिकारी आणि सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात वाहनांचा ताफा होता. त्यामुळे सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात या प्रवासावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

दरम्यान, इंधन बचतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून वाहन ताफे कमी करणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. अशा परिस्थितीत गडकरी यांच्या बस प्रवासासोबत दिसलेल्या मोठ्या ताफ्यामुळे विरोधकांकडूनही प्रश्न उपस्थित केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: May 14, 2026 4:38 PM
Follow Us