Laxman Hake : हरामखोर XXX… हाकेंकडून अजित पवारांना शिवीगाळ, खोल समुद्रात गिरगाव चौपाटीवर आंदोलन अन्…

Laxman Hake : हरामखोर XXX… हाकेंकडून अजित पवारांना शिवीगाळ, खोल समुद्रात गिरगाव चौपाटीवर आंदोलन अन्…

| Updated on: Jul 03, 2025 | 3:54 PM

महाज्योती योजनेच्या निधीअभावी ओबीसी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात आहे, असं म्हणत हाके यांनी थेट समुद्रात उतरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तर अजित पवारांना शिवीगाळही केली

मुंबईमधील आंदोलनाच्या दरम्यान लक्ष्मण हाकेकडून अजित पवारांना शिवीगाळ करण्यात आली. लक्ष्मण हाके यांचं गिरगाव चौपाटीवर आंदोलन सुरू होतं. महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा आरोप हाकेंकडून करण्यात आला तर पोलिसांनी लक्ष्मण हाकेंना सध्या ताब्यात घेतलं आहे. महाज्योतीला निधी मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांसह लक्ष्मण हाके खोल पाण्यात गेले आणि त्यांनी आंदोलन केलं. गिरगाव चौपाटीवर हाके यांनी समर्थकांसह पाण्यात जाऊन आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी केली. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी वेळीच हाकेंना ताब्यात घेतलं. अजित पवारांवर टीका करताना हाकेंनी पातळी सोडली असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी थेट अजित पवार यांनाच शिवीगाळ केली. राज्यभरात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण आधीच तापलेले असताना लक्ष्मण हाके यांनी सरकारच्या धोरणांवर निशाणा साधत सरकारवर घणाघात केला.

Published on: Jul 03, 2025 03:53 PM