Laxman Hake : …अन् लक्ष्मण हाके ढसाढसा रडले; म्हणाले, मी प्रचंड फ्रस्टेड… आता जीव गेला तरी चालेल, नेमकं झालं काय?

Laxman Hake : …अन् लक्ष्मण हाके ढसाढसा रडले; म्हणाले, मी प्रचंड फ्रस्टेड… आता जीव गेला तरी चालेल, नेमकं झालं काय?

| Updated on: Aug 23, 2025 | 10:39 AM

व्हायरल व्हिडीओमध्ये लक्ष्मण हाके यांनी माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडीओमुळे मोठा वाद निर्माण झाला असून अनेक माळी संघटनांनी लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळतंय

मी ओबीसी समाजाबद्दल बोलतोय, माझा जीव गेला तरी चालेल, असं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलंय. कोणीही बोलायला तयार नाही, असं म्हणत असताना लक्ष्मण हाके यांना अश्रू अनावर झाले. ते टीव्ही ९ मराठीशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांच्या भावना अनावर झाल्यात आणि ते भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान नुकताच लक्ष्मण हाकेंचा एक वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी माळी समाजाचं नेतृत्व धनगरांकडे गेल्याने माळी समाजाला पोटशूळ उठलं, असा या व्हायरल व्हिडीओमध्ये हाके बोलत असल्याचे म्हटलं जात आहे. तर या व्हायरल व्हिडीओनंतर मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक धनाजी साखळकरांकडून हाकेंना चप्पलेचा प्रसाद देणाऱ्याला १ लाख ११ हजार रूपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.

Published on: Aug 23, 2025 10:33 AM