हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे…. मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण

हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे…. मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण

| Updated on: Aug 15, 2026 | 5:02 PM

आंतरराष्ट्रीय संस्थांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.ओमानच्या समुद्रात कॅरोलिन बेझेंगी या रशियन तेल टँकरमधून मोठी गळती सुरू झाली आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ या टँकरला अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात तेल समुद्रात पसरले आहे.

ओमानच्या समुद्रात कॅरोलिन बेझेंगी या रशियन तेल टँकरमधून मोठी गळती सुरू झाली आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ या टँकरला अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात तेल समुद्रात पसरले आहे. सॅटेलाइटच्या प्रतिमांनुसार, हे तेल आतापर्यंत तब्बल २००० चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरले आहे आणि ते ओमानच्या मुख्य किनारपट्टीपर्यंत पोहोचले आहे.

या टँकरमध्ये सुमारे ८ लाख बॅरल कच्चं तेल होते. या प्रचंड गळतीमुळे सागरी जीवसृष्टी आणि ओमानच्या संरक्षित सागरी परिसंस्थेला मोठा धोका निर्माण झाला आहे. समुद्रातील मासे, जलचर प्राणी आणि वनस्पती यांच्या जीवनावर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पर्यावरण कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून या घटनेवर चिंता व्यक्त केली जात आहे. समुद्रातील ही तेल गळती थांबवण्यासाठी आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. ही घटना ओमानच्या समुद्रातील पर्यावरणीय समतोलासाठी एक मोठी आपत्ती ठरू शकते.

Published on: Aug 15, 2026 4:41 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us