Omraje Nimbalkar | ओमराजे थेट आंध्र प्रदेशला… नवस फेडण्यासाठी चक्क… नेमकं काय घडलं?

Omraje Nimbalkar | ओमराजे थेट आंध्र प्रदेशला… नवस फेडण्यासाठी चक्क… नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 27, 2026 | 10:17 AM

ठाकरेंच्या गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली होती. महत्त्वाची बाब म्हणजे यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर हे विशेष चर्चेत होते. त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल याच कालावधीत लागला होता.

ठाकरेंच्या गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली होती. महत्त्वाची बाब म्हणजे यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर हे विशेष चर्चेत होते. त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल याच कालावधीत लागला होता. त्यानंतर फुटीर खासदार संजय दीना पाटील हे देखील त्यांच्या पत्रकारांच्या गैरवर्तनामुळे चर्चेत होते. महत्त्वाची बाब म्हणजे आता ओमराजेंबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

शिंदेंच्या सेनेत सामील होताच ओमराजे थेट आंध्र प्रदेशात तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. यावेळी ते एकटेच गेले नसून त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे देखील आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार हे दोन्ही खासदार केंद्रतील मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. दरम्यान, ओमराजे हे नवस फेडण्यासाठी गेल्याचेही समजत आहे. अशावेळी ओमराजे नेमकं कोणतं नवस फेडायला गेले असावेत, अशी शंका अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. त्यांचे तिरुपती मंदिरातील काही फोटो देखील समोर आले आहेत.

Published on: Jun 27, 2026 10:17 AM
Follow Us