राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या नेत्यांच्या संपर्कात? ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह?

राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या नेत्यांच्या संपर्कात? ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह?

| Updated on: May 20, 2026 | 11:19 AM

गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. अनेक नेत्यांनी पक्षांतर केलेले आहे. त्यानंतर झालेल्या निवडणुकीतही अनेक बड्या नेत्यांनी पक्षांतर केले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवले होते, अशी चर्चा होती. अशातच आता पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे.

ऑपरेशन टायगरच्या चर्चांना सर्वात जास्त उधाण तेव्हा आलं जेव्हा ठाकरेंचे एक-दोन नव्हे तर तीन खासदार शिंदेसेनेतील नेत्यांना भेटले. सर्वप्रथम नागेश आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या पाठोपाठच वाघचैरे यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. यानंतर लगेचच ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे श्रीकांत शिंदे यांना भेटले. या भेटीनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले, “मी जिथे आहे तिथे सुखी आहे. विकासकामांसाठी भेटीगाठी होतच असतात.” आष्टीकरांनीही ठाकरेंची साथ सोडणार नाही असं सांगितलं, मात्र चर्चांनी जोर धरायचा तो धरलाच… आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे नेमकं काय काय घडेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Published on: May 20, 2026 11:19 AM
Follow Us