Sharad Pawar : विरोधकांच्या शिष्टमंडळाची आज निवडणूक आयोगासोबत पुन्हा बैठक, पण शरद पवार नसणार; कारण नेमकं काय?
विरोधकांचे शिष्टमंडळ आज पुन्हा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. मतदार याद्यांमधील कथित विसंगतींवर चर्चा करण्यासाठी ही दुसरी बैठक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पूर्वनियोजित पुणे दौऱ्यामुळे या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. बैठकीनंतर मविआ नेते पत्रकार परिषद घेतील.
विरोधकांचे शिष्टमंडळ आज राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची पुन्हा भेट घेणार आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीतील चर्चा अपुरी राहिल्याने ही दुसरी फेरी पार पडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मात्र या शिष्टमंडळासोबत जाणार नाहीत. त्यांचा आज पूर्वनियोजित कार्यक्रम पुण्यात असल्यामुळे ते पुण्याला रवाना होतील अशी माहिती समोर आली आहे.
मंगळवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, रईस शेख आणि प्रकाश रेड्डी या नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतली होती. आजच्या बैठकीत मतदार याद्यांमधील विसंगतींवर चर्चा अपेक्षित आहे. या बैठकीनंतर मविआचे नेते संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
Published on: Oct 15, 2025 10:26 AM
