tv9 Marathi Special Report | सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने; राहुल गांधींचे आंदोलन, मोदींची टीका

tv9 Marathi Special Report | सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने; राहुल गांधींचे आंदोलन, मोदींची टीका

| Updated on: Mar 14, 2026 | 11:03 AM

सिलेंडरच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. या प्रश्नावर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. संसदेबाहेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार निषेध नोंदवला.

सिलेंडरच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. या प्रश्नावर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. संसदेबाहेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार निषेध नोंदवला. याच पार्श्वभूमीवर विधिमंडळ परिसरात काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी हातात सिलेंडरचे पोस्टर घेत घोषणाबाजी केली. सिलेंडरच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. दरम्यान, काँग्रेसच्या या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे. युद्धजन्य संकटाच्या परिस्थितीत काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सिलेंडर तुटवड्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असून, या विषयावर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Mar 14, 2026 11:03 AM
Follow Us