गोव्यात ऑक्सिजनअभावी श्वास गुदमरुन 83 रुग्णांचा बळी

गोव्यात ऑक्सिजनअभावी श्वास गुदमरुन 83 रुग्णांचा बळी

| Updated on: May 15, 2021 | 4:07 PM

गोव्यात ऑक्सिजनअभावी श्वास गुदमरुन 83 रुग्णांचा बळी

मुंबई: गोव्यात ऑक्सिजनअभावी (Goa Oxygen shortage) मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. इथे दररोज श्वास गुदमरुन अनेकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे गोव्यात अक्षरश: मृत्यूचं (Goa corona death) तांडव उभं आहे. सलग चौथ्या दिवशी ऑक्सिजनअभावी 08 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (Goa Medical College and Hospital) गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटे सहा वाजेपर्यंत 13 तर शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटे 8 कोरोना रूग्णांचा तडफडून मृत्यू झाला. प्राणवायूअभावी आजपर्यंत 83 रुग्णांचा बळी गेला आहे.