Asim Munir : भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता? मुनिरचा ठावठिकाणा समजला

Asim Munir : भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता? मुनिरचा ठावठिकाणा समजला

| Updated on: May 12, 2025 | 4:38 PM

India Pakistan Conflict : भारताकडून ओयकिस्तानवर हल्ला होत असताना गायब झालेला पाकचा लष्कर प्रमुख असीम मुनिर कुठे होता, याची माहिती आता समोर आली आहे.

भारताकडून पाकिस्तानवर हल्ला झाला त्यावेळी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनिर हा बंकरमध्ये लपलेला होता. भारताला घाबरून तो बंकरमध्ये लपलेला असल्याची माहिती आता समोर आली आहे.

भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने थेट पाकिस्तानात असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टिमला देखील उडवलं. या सगळ्या घडामोडीत पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असलेला असीम मुनिर हा गायब होता. तो कुठे आहे याबद्दल कोणालाही माहिती नसल्याने पाकिस्तानी नागरिकांकडूनच त्याच्या विरोधात संताप व्यक्त केला जात होता. पाकिस्तानच्या तिन्ही लष्कर दलांचा प्रमुख असलेला असीम मुनिर हा भारताने हल्ला केला त्यावेळी बंकरमध्ये जाऊन लपलेला असल्याची माहिती आता समोर आली आहे. भारताकडून होणाऱ्या हल्ल्याला घाबरून मुनिर बंकरमध्ये लपला होता. भारतीय लष्कराने नूरखान बेसवर हल्ला केला त्यावेळी मुनिर तिथेच होता, असंही सांगण्यात येत आहे.

Published on: May 12, 2025 04:38 PM