Palghar Sadhu Murder Case: आरोप भाजपचे… काशिनाथ चौधरींनी खापर फोडलं मीडियावर

Palghar Sadhu Murder Case: आरोप भाजपचे… काशिनाथ चौधरींनी खापर फोडलं मीडियावर

| Updated on: Nov 19, 2025 | 10:25 AM

पालघर साधू हत्याकांड प्रकरणात भाजपने ज्यांच्यावर आरोप केले होते, त्या काशिनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती मिळाली आहे. यानंतर चौधरींनी माध्यमांना दोषी ठरवत पत्रकार परिषदेत अश्रू ढाळले. आपल्या कुटुंबाला आरोपी ठरवले जात असल्याने त्रास होत असल्याचे ते म्हणाले. भाजपच्या दुटप्पी भूमिकेमुळे हा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर भाजपने आरोप केले होते, त्याच काशिनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशाला सध्या स्थगिती मिळाली आहे. या घडामोडीनंतर पत्रकार परिषद घेताना काशिनाथ चौधरींना अश्रू अनावर झाले. आपली बदनामी माध्यमांमुळे झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. काशिनाथ चौधरी यांनी सांगितले की, मुलाला महाविद्यालयात मित्र गुन्हेगार म्हणून चिडवतात आणि सात वर्षांची मुलगी टीव्हीवर बातम्या पाहून रडते, ज्यामुळे कुटुंबाला प्रचंड वेदना होत आहेत.

२०२० मध्ये डहाणू, पालघर येथे साधूंच्या हत्येचे प्रकरण घडले होते, तेव्हा काशिनाथ चौधरी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य होते. जमावाला शांत करण्यासाठी ते पोलिसांसोवेत घटनास्थळी गेले होते. त्यावेळी भाजपने त्यांच्यावर आरोप केले होते. मात्र, आता घटनेच्या पाच वर्षांनंतर भाजपनेच चौधरींना प्रवेश देण्याचा प्रयत्न केल्याने वाद निर्माण झाला आहे.  भाजपचे समर्थकही पक्षाच्या या भूमिकेवर नाराज झाले आहेत. भाजपच्या दुटप्पी भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे. चौधरींच्या मते, सीआयडी चौकशीत ते निर्दोष सिद्ध झाले आहेत.

Published on: Nov 19, 2025 10:25 AM