चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार…, त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं

चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार…, त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं

| Updated on: Oct 03, 2026 | 12:02 PM

गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोईर यांनी आंदोलनांवर भाष्य केले आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, मात्र सर्वसामान्यांना त्रास होऊ नये. आंदोलनात असामाजिक घटक घुसखोरी करत असल्याचा संशय असून, पोलीस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. दोषींवर निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल, असे भोईर यांनी स्पष्ट केले. मुंबई पोलिसांनी व्हिडिओ फुटेज मागवले असून सखोल चौकशी सुरू आहे.

राज्यात सुरू असलेल्या विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोईर यांनी महत्वपूर्ण भाष्य केले आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, आंदोलनामुळे सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलनांमध्ये काही असामाजिक घटक घुसखोरी करून परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत का, यावर आंदोलनकर्त्यांनी देखील विचार करणे गरजेचे आहे, असे भोईर यांनी नमूद केले.

राज्यातील जनतेला सुरक्षित ठेवणे हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे सर्व आंदोलकांवर पोलिसांची बारीक नजर आहे. कुठलेही असामाजिक तत्व आंदोलनात घुसून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे. कालच्या आंदोलनात असामाजिक तत्वे होती का, याची सखोल माहिती घेतली जात आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अर्बन नक्षल विचारांचे लोक सहभागी झाल्याच्या आरोपांचीही शहानिशा करून सत्यतेनुसार कारवाई करण्याचे आश्वासन भोईर यांनी दिले. मुंबई पोलिसांनी आंदोलनाचे व्हिडिओ फुटेज मागवले असून पुढील चौकशी सुरू आहे.

 

Published on: Oct 03, 2026 12:02 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us