NCP Big Update | प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी दिली सर्वात मोठी अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने काही महिन्यांपूर्वी नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीसोबतचा करार संपवला. विधानसभा निवडणुकीत नरेश अरोरा यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून काम केले होते. आता त्यांच्या जागी प्रशांत किशोर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे सगळीकडे प्रशांत किशोर हेच राष्ट्रवादीचे नवे रणनीतीकार असतील अशी चर्चा रंगली होती.

मात्र राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी नुकतंच एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की, पक्ष सध्या प्रशांत किशोर यांच्यासोबत काम करणार नाही. आम्ही गरज असेल तेव्हा एकमेकांसाठी उपलब्ध राहू.
पार्थ पवारांचं ट्वीट या प्रमाणे: “प्रशांतजी हे आमचे मित्र आणि भावासारखे आहेत. दादांच्या काळापासून त्यांची आमच्याशी ओळख आहे. काल ते शहरात आले होते, त्यामुळे त्यांचे घरी जेवणासाठी स्वागत करण्याची आणि काही अर्थपूर्ण चर्चा करण्याची संधी आम्हाला मिळाली.
ते Nationalist Congress Party (NCP) सोबत काम करत असल्याच्या चर्चांबाबत स्पष्ट सांगू इच्छितो की, माझ्या माहितीनुसार त्यांनी काही वर्षांपूर्वीच राजकीय सल्लागार क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तरी त्यात बदल होईल असे मला वाटत नाही. मात्र, एक गोष्ट नक्की सांगू शकतो की, गरज पडेल तेव्हा आम्ही एकमेकांसाठी नेहमीच उपलब्ध राहू.”