Narendra Modi | WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; ‘जग संघर्षात, पण भारत आत्मविश्वासाने पुढे जातोय…’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज TV9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ (WITT) समिटमध्ये सहभागी होत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यापूर्वीच्या दोन समिटप्रमाणे यंदाही त्यांच्या भाषणानेच कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या भाषणात मोदी यांनी हलक्या-फुलक्या शैलीत TV9 च्या बातम्यांवर भाष्य करत सांगितले की, “कधी कधी मला TV9 पाहण्याची संधी मिळते. तुमचा फोकस नेहमी युद्ध आणि मिसाईलवर जास्त असतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज TV9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ (WITT) समिटमध्ये सहभागी होत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यापूर्वीच्या दोन समिटप्रमाणे यंदाही त्यांच्या भाषणानेच कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या भाषणात मोदी यांनी हलक्या-फुलक्या शैलीत TV9 च्या बातम्यांवर भाष्य करत सांगितले की, “कधी कधी मला TV9 पाहण्याची संधी मिळते. तुमचा फोकस नेहमी युद्ध आणि मिसाईलवर जास्त असतो. सध्या तर जगभरातून इतका कंटेंट मिळतोय की तुम्हाला भरपूर बातम्या मिळत आहेत,” असे ते हसत म्हणाले. यानंतर गंभीर मुद्द्यांवर बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या जग खूप कठीण आणि अभूतपूर्व परिस्थितीतून जात आहे. अशा वेळी TV9 नेटवर्कने विचार मांडण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ तयार केले आहे, याबद्दल त्यांनी कौतुक केले. मोदी म्हणाले की, आज जगभरात संघर्षाचे वातावरण आहे आणि त्याचे परिणाम सर्व देशांवर दिसत आहेत. त्यामुळे भारत आणि जगाबद्दल चर्चा करणे खूप महत्त्वाचे ठरते. भारताच्या प्रगतीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, २०१४ पूर्वीची परिस्थिती मागे टाकून भारत आता नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून भारत आता आव्हानांपासून पळत नाही, तर त्यांचा ठामपणे सामना करत आहे.
