केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान… गेल्या 24 तासात दोन व्हिडीओ अन् 6 मोठे निर्णय, दिल्लीत काय घडतंय?

केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान… गेल्या 24 तासात दोन व्हिडीओ अन् 6 मोठे निर्णय, दिल्लीत काय घडतंय?

| Updated on: Jul 25, 2026 | 11:29 AM

नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात राजकीय वातावरण तापले असून दिल्लीतील जंतर-मंतर येथे मोठे आंदोलन सुरू आहे. सीजेपी आणि कॉक्रोज जनता पक्षाच्या समर्थकांनी आंदोलन करत नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर दोन व्हिडिओ शेअर केले असून त्यांना कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत

नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात राजकीय वातावरण तापले असून दिल्लीतील जंतर-मंतर येथे मोठे आंदोलन सुरू आहे. सीजेपी आणि कॉक्रोज जनता पक्षाच्या समर्थकांनी आंदोलन करत नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर दोन व्हिडिओ शेअर केले असून त्यांना कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 24 तासांत 6 महत्त्वाचे निर्णय जाहीर केल्याची चर्चा सुरू आहे.

या निर्णयांमध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचा निर्णय, संसदेत संबंधित विधेयक मांडण्याची तयारी, शिक्षण विभागात बदल, NTA मधील 47 अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई, शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल न करण्याचा निर्णय आणि NEET पेपर लीक प्रकरणाशी संबंधित आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई देण्याची घोषणा यांचा समावेश असल्याचा दावा केला जात आहे.

Published on: Jul 25, 2026 11:29 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us