Asim Sarodes License Suspended :  कोश्यारींना फालतू बोलले म्हणून सनद रद्द! आता संघर्ष अटळ, ठाकरेंकडून सरोदेंची पाठराखण

Asim Sarodes License Suspended : कोश्यारींना फालतू बोलले म्हणून सनद रद्द! आता संघर्ष अटळ, ठाकरेंकडून सरोदेंची पाठराखण

| Updated on: Nov 05, 2025 | 12:00 AM

वकील असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींबद्दल वादग्रस्त विधान केल्याने ही कारवाई झाली. उद्धव ठाकरेंनी या निर्णयावर तीव्र टीका करत, महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई नाही, पण बोलणाऱ्यांवर कारवाई, असे म्हणत सरोदेंना पाठिंबा दिला आहे. यामुळे राजकारण पुन्हा तापले आहे.

वकील असीम सरोदे यांची वकिलीची सनद बार कौन्सिलने तीन महिन्यांसाठी रद्द केल्याने महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना फालतू संबोधल्याबद्दल आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निर्णयावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांचा अवमान करणाऱ्या कोश्यारींवर कारवाई होत नाही, पण त्याबद्दल बोलणाऱ्यांवर कारवाई केली जाते, हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे ठाकरेंनी म्हटले आहे. सरोदेंना पाठिंबा देताना, हा गप्प बसा आणि आमची गुलामगिरी करा या कटाचा भाग असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

असीम सरोदे यांनी या निर्णयाला “प्रमाणाबाहेर, तर्कहीन, अतार्किक आणि बेकायदेशीर” म्हटले आहे. तसेच, फालतू हा शब्द असंसदीय नसताना केवळ मलाच का लक्ष्य केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी इतर प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई न करण्याच्या दुटप्पी धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Published on: Nov 04, 2025 11:59 PM