NCP : शरद पवारांचे आमदार अस्वस्थ, लागले सत्तेचे वेध अन् शरद पवारांसमोर मोठा पेच? नेमकं घडतंय काय?

NCP : शरद पवारांचे आमदार अस्वस्थ, लागले सत्तेचे वेध अन् शरद पवारांसमोर मोठा पेच? नेमकं घडतंय काय?

| Updated on: Jun 16, 2025 | 9:40 AM

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अस्वस्थ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोधी पक्षामध्ये राहून मतदारसंघातील काम होत नसल्याने आमदार अस्वस्थ आहेत. सत्तेमध्ये जायला हवं अशी मागणी या आमदारांनी शरद पवार यांच्याकडे देखील केल्याचं कळत आहे. मात्र भाजपसोबत युती करणार नाही अशी भूमिका शरद पवारांची आहे तशी माहिती मिळतेय.

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडून अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी झाली आणि त्यानंतर शिवसेनेप्रमाणेच एक गट सत्ताधारी तर दुसरा विरोधी बाकांवर बसला. पण आता पवारांच्या राष्ट्रवादीतल्या काही आमदारांना सत्ता खुणावत असल्याची सूत्रांची माहिती आहे. विरोधी पक्षात राहून मतदारसंघातील काम होत नसल्याने आमदार अस्वस्थ झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सत्तेत जाण्यासाठी या आमदारांनी शरद पवारांकडे सुर आवळलाय, अशी देखील माहिती मिळतेय. मात्र भाजपसोबत युती करणार नाही अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. भाजपसोबत जाण्यास शरद पवार तयार नाही असल्याचं समोर येत आहे. दरम्यान इतर पक्षांतील लोकांना भविष्य अंधकारमय दिसत आहे. त्यामुळे ते सोबत येण्यास उत्सुक असल्याचं गिरीश महाजन म्हणालेत. तर निधी मिळत नाही म्हणून पक्ष सोडणार का असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 16, 2025 09:40 AM