Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार

Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार

| Updated on: Oct 09, 2026 | 11:23 AM

ठाण्यात आज प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी आज सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका मुख्यालयापासून पोलीस आयुक्तालयापर्यंत हा मोर्चा जाईल. गुंडगिरी आणि अमली पदार्थमुक्त ठाण्याच्या मागणीसाठी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले जाणार आहे. सायंकाळी चार वाजता हा मोर्चा निघेल.

ठाण्यात आज प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी आज (दि. ४) सर्वपक्षीय मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून पोलीस आयुक्तालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असून, ठाणे पोलिसांनी त्यासाठी परवानगी दिली आहे. पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यामध्ये मोठ्या संख्येने सर्वपक्षीय नेते एकत्र येत या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

सध्या ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ या मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे. हा मोर्चा पोलीस आयुक्तालयाच्या दारात जाऊन न्याय मिळवण्याची मागणी करणार आहे. भयमुक्त ठाणे आणि ड्रग्समुक्त ठाणे यासाठी एकत्र येण्याचे आवाहन बॅनरवर करण्यात आले आहे. गुंडगिरीतून शहराला वाचवण्यासाठी आणि अमली पदार्थमुक्त करण्यासाठी ठाण्यातील नागरिकांनी एकत्र यावे, असा मजकूर बॅनरवर झळकताना दिसत आहे. सायंकाळी चार वाजता सुरू होणारा हा मोर्चा ठाणे महानगरपालिका मुख्यालयापासून थेट पोलीस आयुक्तालयापर्यंत जाईल आणि पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करेल.

 

Published on: Oct 09, 2026 11:23 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us