Priyanka Gandhi | सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला? धर्मेंद्र प्रधानांवरून प्रियांका गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Priyanka Gandhi | सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला? धर्मेंद्र प्रधानांवरून प्रियांका गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

| Updated on: Jul 28, 2026 | 1:27 PM

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर संसदेत धर्मेंद्र प्रधान यांचं झालेल्या स्वागतावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी तीव्र टीका केली आहे. सत्ताधारी खासदारांनी धर्मेंद्र प्रधान यांचं ज्या पद्धतीने स्वागत केलं, त्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, “एखादा सुपरस्टार संसदेत आला अशा पद्धतीने धर्मेंद्र प्रधान यांचं स्वागत करण्यात आलं. मात्र, त्यांनी कोणत्या परिस्थितीत राजीनामा दिला, हे देशाने पाहिलं आहे. अशा प्रकारचं स्वागत झाल्यानंतर या सरकारवर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही.”

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरही सरकारला लक्ष्य केलं. नीट पेपरफुटी प्रकरणानंतरही विद्यार्थ्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करत, “आजही विद्यार्थ्यांना त्रास दिला जात आहे. विद्यार्थ्यांशी अशी वागणूक का दिली जाते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संसदेतील घडामोडी आणि प्रियांका गांधी यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या भूमिकेवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Jul 28, 2026 1:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us