पुण्यात एकामागोमाग एक अपघात! रस्त्यावर ऑइल-चिखलाचा थर; 15 वाहनांची घसरगुंडी, नेमकं काय घडलं?

पुण्यात एकामागोमाग एक अपघात! रस्त्यावर ऑइल-चिखलाचा थर; 15 वाहनांची घसरगुंडी, नेमकं काय घडलं?

| Updated on: Aug 04, 2026 | 10:37 AM

पुण्यातील जुन्या RTO चौक ते नायडू हॉस्पिटलदरम्यान आज सकाळी मोठा अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यावर साचलेला चिखल आणि वाहनांमधून सांडलेल्या ऑइलमुळे अनेक वाहने घसरल्याने सलग अपघातांची मालिका घडली. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत सुमारे 15 वाहने अपघातग्रस्त झाली आहेत.

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, या मार्गावर तब्बल 20 ते 25 दुचाकी घसरून पडल्या. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असून, अनेक वाहनचालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या रस्त्यावरील चिखल आणि ऑइल साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, अग्निशामक दलाने नागरिकांना आणि वाहनचालकांना या मार्गावरून प्रवास करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर चिखल किंवा ऑइलमुळे वाहन घसरण्याचा धोका वाढत असल्याने वाहनांचा वेग नियंत्रित ठेवावा आणि सुरक्षित अंतर राखून वाहन चालवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Published on: Aug 04, 2026 10:37 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us