पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्… व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
पुण्यात एका कंत्राटदाराच्या मृत्यूची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. आर्थिक व्यवहार आणि पैशांच्या देवाणघेवाणीशी संबंधित वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे.

खलील शेख असे संबंधित कंत्राटदाराचे नाव असून ते बांधकाम क्षेत्राशी संबंधित काम करत होते. त्यांच्या निधनापूर्वी त्यांनी काही व्हिडीओ रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही व्यक्तींविरोधात आरोप केल्याचेही सांगितले जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या व्हिडीओमध्ये काही राजकीय व्यक्ती आणि इतर संबंधितांचा उल्लेख करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. पोलिसांकडून व्हिडीओ आणि इतर कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. यामध्ये कोणत्या राजकीय नेत्यांचा तसेच स्थानिक कार्यकर्त्यांचा सहभाग आहे का? याचा तपास केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तपास यंत्रणा सर्व बाजूंनी चौकशी करत असून तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.