Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रशासनाने धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडले आहेत. सध्या धरणातून तब्बल 43,500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, मुठा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीपात्राजवळ जाणे टाळावे, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला असून, पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक आणखी वाढल्यास विसर्गात वाढ करण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.