MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?

MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?

| Updated on: Oct 08, 2026 | 8:04 PM

पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन आज आठव्या दिवशीही सुरू आहे. पोलिसांनी आंदोलनस्थळ सोडण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. उपोषणादरम्यान ऋषिकेश गांगुर्डे आणि गजानन शेळके या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आंदोलनावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत.

पुणे एमपीएससी विद्यार्थी आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आंदोलनस्थळ तातडीने सोडण्याचे आवाहन केले आहे. तसेच, रस्ता अडविणे, वाहतूक रोखणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे किंवा नागरिकांना त्रास होईल असे कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. आंदोलनाच्या आठव्या दिवशी उपोषण करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे. ऋषिकेश गांगुर्डे आणि गजानन शेळके या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या आंदोलनावरून राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर देत या आंदोलनाला विरोधी पक्षाचे आंदोलन समजू नये, अशी भूमिका मांडली. तर, आमदार संजय शिरसाट यांनी काही राजकीय नेते या विद्यार्थ्यांच्या व्यासपीठाचा वापर आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी करत असल्याचा आरोप केला. एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी हा ठिय्या मांडला आहे.

Published on: Oct 08, 2026 8:04 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us