तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच… पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात अटक असलेली आरोपी सिया गोयल हिला आज पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासासाठी शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी नेले. 18 जून रोजी घडलेल्या या प्रकरणाच्या तपासात पोलिसांकडून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. घटनेपूर्वी आणि घटनेनंतर सिया गोयल ज्या ज्या ठिकाणी गेली होती, त्या सर्व ठिकाणांचा पोलिसांनी पंचनामा केला.

तपासादरम्यान सियाने घटनेच्या दिवशी परिधान केलेले कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत. तसेच सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालला मारण्यापूर्वी ज्या ठिकाणी सराव केल्याचा संशय आहे, त्या जागेलाही पोलिसांनी भेट दिली. संबंधित ठिकाणाचा बारकाईने आढावा घेत पंचनामा करण्यात आला.
पुण्यातील एरिया 37 परिसरात हा सराव करण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. त्यामुळे या परिसरातही पोलिसांची हालचाल वाढली होती. या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.