मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं

| Updated on: Jul 21, 2026 | 6:44 PM

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर काल झालेल्या लाठीमार नंतर आज पुन्हा एकदा आंदोलन चिघळलं आहे. तरुण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदींच्या निवासस्थानी धरणे आंदोलन सुरू केलं आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर काल झालेल्या लाठीमार नंतर आज पुन्हा एकदा आंदोलन चिघळलं आहे. तरुण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदींच्या निवासस्थानी धरणे आंदोलन सुरू केलं आहे. तसेच प्रत्येक देशवासियांना मोदींच्या घरासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून हे आवाहन केलं आहे. मात्र अचानक आता राहुल गांधींचं आंदोलन चिघळल्याचं सांगितलं जात आहे.

आंदोलनस्थळी आता पोलीस दाखल झाले असून त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यसा सुरुवात केळी आहे. एकूण आंदोलन चिघळलं असून आंदोलन करणारे काही खासदार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी आंदोलन स्थळी सुप्रिया सुळे तसेच अखिलेश यादव देखील उपस्थित होते असं सांगितलं जात आहे.

Published on: Jul 21, 2026 6:44 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us