Rahul Gandhi | AK-47 ने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार, मोदींचं आश्वासन कुठं गेलं? हे सरकार खोटं आहे; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. बिहारमधील आंदोलनकर्त्यांवर अत्याचार झाल्याचा आरोप करत त्यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

राहुल गांधी यांनी दावा केला की, बिहारमध्ये आंदोलनकर्त्यांवर एके-47 सारख्या शस्त्रांमधून गोळीबार करण्यात आला. तसेच शेकडो आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूर्वीच्या आश्वासनाचाही उल्लेख केला. “विद्यार्थ्यांवर कोणताही एफआयआर दाखल केला जाणार नाही, असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं. मग त्या आश्वासनाचं काय झालं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, बिहार असो किंवा दिल्ली, सरकारची भूमिका सर्वत्र सारखीच दिसत आहे. “हे सरकार खोटं बोलत आहे. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणं त्यांच्या आवाक्याबाहेरचं आहे. ते स्वतःच्या शब्दांपासून मागे हटतात आणि प्रत्येक मार्गाने विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात,” असा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर विद्यार्थी आंदोलन आणि सरकारच्या भूमिकेवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.