Rahuri Vidhan Sabha | अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी; लढत चुरशीची होणार?
राहुरी मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्प आजाराने 17 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला होता. राजकीय प्रवासाची सुरुवात त्यांनी अगदी सामान्य कार्यकर्ता म्हणून केली होती. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर आता त्यांचा मुलगा अक्षय शिवाजीराव कर्डिले भाजपकडून विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी तिकिट देण्यात आले आहे.
राहुरी मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्प आजाराने 17 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला होता. राजकीय प्रवासाची सुरुवात त्यांनी अगदी सामान्य कार्यकर्ता म्हणून केली होती. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर आता त्यांचा मुलगा अक्षय शिवाजीराव कर्डिले भाजपकडून विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी तिकिट देण्यात आले आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील 2026 च्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. सुरुवातीपासूनच या पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांनाच तिकीट मिळेल असं सांगितलं जात होतं. त्यानुसा अखेर भाजपने त्यांना तिकिट दिले आहे. आता वडिलांच्या जागी अक्षय कर्डिले निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे कर्डिले जागा राखतात की गमावतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विरोधकांनी अजून राहुरीचा उमेदवार घोषित केलेला नाही. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे राहुरीतील लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
