Navnath Ban On Sanjay Raut | एकनाथ शिंदे-राज ठाकरे भेटीवर राजकीय वाद; राऊत आणि बन यांच्यात टीका-प्रत्युत्तर
एकनाथ शिंदेनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला अशा शब्दात राऊत यांनी टीका केली आहे. तर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, असे वक्तव्य करत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्यत्तर दिलं आहे. शिंदे आणि ठाकरेंच्या या भेटीवर राजकीय वर्तुळात टीका टिपण्णी सुरू झाली आहे.
काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी नंदनवन बंगल्यात झाली. त्यावेळी शिंदे यांनी राज ठाकरे यांचा सत्कार केला. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली. या भेटीत विविध राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर ही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची पहिली भेट होती.
यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, एकनाथ शिंदेनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला अशा शब्दात राऊत यांनी टीका केली आहे. तर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, असे वक्तव्य करत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्यत्तर दिलं आहे. शिंदे आणि ठाकरेंच्या या भेटीवर राजकीय वर्तुळात टीका टिपण्णी सुरू झाली आहे.
Published on: Feb 19, 2026 03:20 PM
