ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
मुंबईतील दादर येथील वीर सावरकर मार्गावर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या संयुक्त विजय जल्लोष सभेला मोठी गर्दी झाली. यावेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित होते. सभेत बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आणि आंदोलनामुळे सरकारला मोठा धक्का बसल्याचा दावा केला.

राज ठाकरे म्हणाले, “तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवले. पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आले, त्याचा उत्साह साजरा करायचा म्हणून तुम्ही सर्वजण इथे विजय साजरा करण्यासाठी जमले. या देशातील जेंझनी या सरकारच्या झिंज्या कशा उपटल्या हे आपल्याला या आंदोलनातून कळले. ही तरुणांची ताकद आहे की सरकारला अखेर नमवलं”
यावेळी त्यांनी NEET परीक्षा आणि पेपरफुटी प्रकरणाचाही उल्लेख केला. “आज NEETच्या परीक्षा, पेपरफुटीचे झालेले सर्व आंदोलन आणि त्यानंतर आपल्या देशभरात बसलेल्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मी त्यांची आता नावे वाचून दाखवणार आहे,” असे ते म्हणाले. यानंतर राज ठाकरे यांनी विविध राज्यांतील काही विद्यार्थ्यांची नावे सभेत वाचून दाखवली.